कर्डिलेंचे मानसिक संतुलन बिघडले; राष्ट्रवादीच्या नेत्याचे वादग्रस्त विधान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पक्षातील अंतर्गत वाद, गटबाजीचे प्रकरणे ताजी असतानाच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने चक्क माजी आमदारावर खालच्या पातळीची टीका केली आहे.

आमदारकी गेल्यापासून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आजवर दडपशाही करून ठेवलेले कार्यकर्ते आता दूर गेल्याने त्यांना त्यांच्या अस्तित्वाची चिंती लागली आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव बेरड यांनी केली.

पत्रकात बेरड यांनी म्हटले आहे, की शिवसेना व राष्ट्रवादीने कर्डिले यांना राहुरी मतदारसंघात पराभवाची धूळ चारली. आजवर शिवसेना साथ देत होती, म्हणूनच तुम्ही आमदार होत होतात. कर्डिलेंनी स्वतःच्या मुलाला राजकारणात आणण्यासाठी पुतण्यांना राजकारणात येऊ दिले नाही.

जो कुटुंबाचा वाली झाला नाही, तो कार्यकर्त्यांचा काय होणार, या भावनेने कार्यकर्तेही दूर जात आहेत. नगर तालुक्‍यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस महाआघाडीनेच तुम्हाला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत धूळ चारली, आमदारकी गेल्यापासून ते स्वतःच कार्यकर्त्यांना बोलावून घेतात.

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आघाडी सरकारवर वादग्रस्त विधाने करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर भाष्य करण्यापेक्षा त्यांनी स्व-अस्तित्वाची चिंता करावी, असे बेरड यांनी पत्रकात म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment