अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी तिघाना कोरोनाची लागण, रुग्णांचा आकडा पोहोचला 17 वर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून,

गुरुवारी (दि.२) रात्री आलेल्या अहवालांमध्ये आणखी तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील तपासणीचे अहवाल गुरुवारी दिवसभरात प्राप्त झाले. दुपारी सहा रुग्णांना कोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

रात्री ६० अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यात संगमनेर मधील दोघांचा तर जामखेड मधील एका तरुण व्यक्तीचा समावेश आहे.

हे तिघेही परदेशी नागरिकांच्या संपर्कात होते. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या सतरावर पोहोचली आहे.

दरम्यान  नगर जिल्ह्यामध्ये आज एकाच दिवशी 9 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

आता नगर जिल्ह्यात एकूण 17 रूग्ण झाले आहेत,

नगरकरांनी अजूनही लॉक डाउन पाळावा विनाकारण कुणीही बाहेर फिरू नये असे आव्हान जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment