अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच असून काल सोमवारी एकाच दिवशी १३ नवे रुग्ण सापडल्याने सामान्य लोकांसह प्रशासन हादरले आहे.
काल सोमवारी श्रीगोंदा तालुक्यात १३ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्याचा कोरोना बाधित व्यक्तींचा एकुण आकडा ७८ वर पोहोचला आहे.
काष्टी येथे कोरोनाची एन्ट्री झाली आहे. चिखलठाणवाडी येथेही नवा रुग्ण आढळला आहे. घारगाव, घोगरगाव, देवदैठण, कोळगाव, चांडगाव या ठिकाणी जुन्या रुग्णांच्या घरातील लोक कोरोना पाॅझिटिव्ह मिळाले.
काल रुग्ण सापडलेले गावे व रुग्ण संख्या अशी- घोगरगाव -४, देवदैठण- ३, घारगाव-२, काष्टी, कोळगाव, चिखलठाणवाडी व चांडगाव प्रत्येकी १.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा