अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १६५ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१ रुग्ण बाधित आढळून आले
तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि पोर्टलवर नोंद झालेल्या ८३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
याशिवाय, अँटीजेन चाच्ण्यात बाधित आढळलेल्या ४१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ९१५ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २१९२ इतकी झाली आहे.
दरम्यान, आज १०० रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १२३३ इतकी झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅबमध्ये गेल्या २४ तासात ४१ रुग्ण बाधित आढळून आले. यामध्ये राहाता ०३ (साकुरी), पारनेर ०४ (ढवळपुरी ०२, सारोळा आडवाई ०१, किन्ही ०१),
श्रीगोंदा १३ (घोगरगाव ०४, काष्टी ०१, चिकलठाणवाडी ०१, चांडगाव ०१, कोळगाव ०१, देवदैठण ०३, घारगाव ०२), पाथर्डी ०१ (सोनोशी), शेवगाव ०२ (मंगरूळ ०१, शेवगाव शहर ०१), श्रीरामपूर ०२,
नगर ग्रामीण ०३, नगर शहर १३.
याशिवाय, जलद गतीने कोरोना निदान करण्यासाठी आता अँटीजेन चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये आज ४१ जण बाधित आढळले. त्यात, श्रीरामपूर ०९, नेवासा १६,, कोपरगाव ०२, संगमनेर १०, कॅन्टोन्मेंट ०१, मनपा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ८३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.
- उपचार सुरू असलेले रुग्ण:९१५
- बरे झालेले रुग्ण: १२३३
- मृत्यू: ४४
- एकूण रुग्ण संख्या:२१९२
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा