अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नगर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक झाला होता. सद्यस्थितीला परिस्थिती पूर्वपदावर येत असून तालुक्यात सुमारे पावणे चौदा हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे आहे तर ४०२ जणांना आपले प्राण गमवावे लागले.
नगर तालुक्यात स्थिती आता नियत्रंणात येत असून, मागील महिन्याच्या तुलनेत या महिनाअखेरीस सक्रिय रूग्णांची संख्या निम्म्याने घटली आहे. नगर तालुक्यात १३ हजार ७४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील १८ गावे कोरोनामुक्त झाले असुन आणखी १८ गावे त्या वाटेवर आहेत.

एकुण ३६ गावांत रुग्णसंख्या आता १०च्या आत आली आहे. ही आकडेवारी तालुक्यासाठी दिलासादायक आहे. तालुक्यात एप्रिल अखेर कोरोना बाधितांची संख्या ९ हजार ८२४ इतकी होती.मे महिन्यापर्यत ती वाढत जाऊन १४ हजार ७१२ इतकी झाली.
तालुक्यात आतापर्यत १३ हजार ७४३ रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मे महिन्याच्या सुरूवातीला तालुक्यात १ हजार २५६ इतके सक्रिय रूग्ण होते. मात्र मे महिन्याच्या अखेरीस ही संख्या निम्याने घटली असुन सध्या ५६७ सक्रिय रुग्ण ऊरले आहेत.
तालुक्यात आतापर्यत ४०२ जणांना यात जीव गमवावा लागला. तालुक्यातील १८ गावे कोरोना मुक्त झाले असून सध्या तेथे एकही रुग्ण नाही. तर आणखी १८ गावाची रूग्णसंख्या प्रत्येकी १ वर आली असुन ही गावे ही कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत .
तालुक्यातील ३६ गावात रुग्णसंख्या १० च्या आत आली आहे. तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४१टक्के तर मृत्युदर २.७३ टक्के एवढा आहे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ३.८५ टक्के एवढे आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम