अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी २० ने वाढली त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील बाधितांची संख्या १७२ वर जाऊन पोहोचली आहे.
नगर शहरातील मार्केट यार्ड भागातील बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी तिघे पॉझिटिव्ह निघाले. मार्केट यार्डमधील २८ वर्षांचा युवक, माळीवाड्यातील ४२ वर्षांचा पुरुष व केडगावातील २९ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली.
बाधितांपैकी सात रुग्ण अकोले तालुक्यातील आहेत. इतर रुग्ण संगमनेर, नगर, श्रीगोंदे आणि राहाता तालुक्यातील आहेत.
अकोले तालुक्यात जवळे येथील ४८ व २४ वर्षीय महिला, २८ वर्षीय पुरुष, तर वाघापूर येथील ३२ व ४० वर्षीय महिला, तसेच ४५ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला. सर्व बाधित यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.
संगमनेर तालुक्यात दोन जण आढळले. डिग्रस, मालुंजा येथील २१ व ४५ वर्षीय महिला बाधित झाली आहे. श्रीगोंदे तालुक्यात कांडेगाव येथील ७५ वर्षीय महिला बाधित आढळून आली.
लोणी येथील ५६ वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आली. नगर शहरात स्टेशनरोडवरील ३३ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे.
दरम्यान, मंगळवारी पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील १, संगमनेर येथील एक, म्हसणेफाटा पारनेर येथील एक व नगर तालुक्यातील २ अशा एकूण पाच रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७८ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आणखी ४९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews