अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- कोरोनाचा विस्फोट झाल्याने तालुक्यात एकाच दिवशी बेचाळीस कोरोना बाधीत रुग्ण सापडले. पाथर्डी शहर लाँकडाऊन केले आहे.
तालुक्यातील त्रिभुवनवाडी, कोल्हार, आगखांड, पिपंळगावटप्पा, शिक्षक काँलनी, तिसगाव येथे रुग्ण सापडेलला भाग सिल केला आहे. प्रशासनातील महसुल, आरोग्य व पोलिस विभागाच्या अधिका-यांच्या कामातही आता अस्थिरता येत आहे.
नागरीकामधे कोरोनाची भिती असली तरी नियम पाळण्यात येत नाहीत. नियमांचे उल्लघन करणा-या विरु्दध प्रशासनही ठोस कारवाई करीत नाही.
कोरोनाचे काम करायचे की कारवाईला वेळ द्यायचा अशा दुहेरी अडचणीत प्रशासन सापडले आहे. पाथर्डी शहरात सध्या चोवीस कोरोना पाँझीटीव्ह रुग्ण आहेत.
कोल्हार येथे अकरा, तिसगाव चार, त्रिभुवनवाडी पाच, आगसखांड पाच, पिपंळगावटप्पा एक हे उपचार घेत आहेत. शहरात आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. शहरातुन रोज अनेक वाहने राज्यातील विविध भागात ई-परवाना घेवुन जातात.
ते पुन्हा दुस-या दिवशी येथे येतात. कोण परजिल्ह्यात गेले. कधी गेले परत कधी आले याचा कोणताही तपशील प्रशासनाकडे एकत्रीत सापडत नाही. रेडझोनमधे जाऊन आलेले लोकांना कोरटाईन केले जात नाही.
तसे करण्यासाठी लागणारी यंत्रणा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. परिणामी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]