अहमदनगर जिल्ह्यातील अवघ्या 10 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  दिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आज नव्याने चार रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात सापडले आहेत.

यात श्रीगोंदा तालुक्यातील अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाला कोरोना व्हायरस ची लागण झाली आहे.श्रीगोंदा फॅक्टरी येथे दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. पहिल्या रुग्णाच्या घरातीलच 10 महिन्यांचे बाळाला कोरोना झाला आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी माहिती दिली. कालच्या तपासणीत सगळे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी हा दहा महिन्यांच्या मुलाची पुन्हा तपासणी केल्यावर तो कोरोनाग्रस्त असल्याचे लक्षात आले.

अहमदनगर कोरोना अपडेट – Ahmednagar Corona Updates

जिल्ह्यात आतापर्यंत ०९ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद (०७ अहमदनगर + ०२ मुंबई)

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या  ;- १०३

(महानगरपालिका क्षेत्र १८, अहमदनगर जिल्हा ५०, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा २५)

जिल्हयातील अॅक्टीव केसेस ३७ (+03 नाशिक)

जिल्ह्यातील रुग्ण मृत्यू दर ८.७३ टक्के

एकूण स्त्राव तपासणी २२३७

निगेटीव  –  २०३६ रिजेक्टेड – ०२५ निष्कर्ष न निघालेले – १५ अहवाल बाकी – ५५

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment