श्रीगोंदा तालुक्यात महिलेचा कोरोनाने मृत्यू

Published on -

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील एका ५० वर्षीय महिलेचा कोरोनाणे मृत्यू झाला असून सदर महिला पारनेर तालुक्यातील सूपा येथे उपचार घेत होती.

तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच असून आज तब्बल 33 जण कोरोना बाधित निघाले आहेत. त्यातील शहरात आज सर्वाधिक 22 रुग्ण निघाल्याने शहरात कोरोनाची मोठी धास्ती आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यात एकूण 269 कोरोना रुग्ण संख्या झाली असून, त्यातील शहराचा वाटा मोठा आहे. आज तालुक्यात 33 पॉझिटिव्ह आले त्यातील 22 व्यक्ती शहरातील आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe