‘ह्या’ तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. 

काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका  कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत.

मागील 3 दिवसात 20 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने आत्तापर्यंत ५७ बाधीतांची नोंद झाली आहे. तालुक्यात दररोज कोरोनाबाधीत रुग्णांची साखळी वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या एका बड्या नेत्याच्या कुटूंबातील 4 सदस्यांना घरातील एका कामगारामुळे कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली.

सध्या 26 बाधीत रुग्णावर उपचार सुरू असुन त्यापैकी काही रुग्ण कोपरगाव येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये, 4 नगर येथील विळद घाटातील विखे पाटील कॉलेजमध्ये,

2 पुणे तर 1 नाशिक येथे उपचार घेत आहेत. अशी माहीती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment