श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या @३००

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सात हजाराच्या पुढे गेला आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावांत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा तीनशेच्या पार गेला आहे. यामध्ये उपचार घेऊन बरे होणारी संख्याही दोनशेच्या आसपास आहे.

यामध्ये तीन जणांचे मृत्यू झाले आहे. शहर दोन दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आले असले तरी तालुक्यात एकाच दिवशी 27 पॉझिटिव्हची भर पडली.बुधवारी (दि. 5) 27 नवे बाधित रुग्ण अहवालात पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यात 7 जण शहरातील आहेत. कोळगाव 4, मढेवडगाव 2, काष्टी 2, रुईखेल 2, पारगाव सुद्रीक 6, खरातवाडी, देवदैठण, येळपणे, बेलवंडी येथील प्रत्येकी एक असे बाधित 27 रुग्ण आहेत.

काल 135 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यात 27 बाधित सापडले. तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढतच असून नवे 27 करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

त्यामुळे एकूण करोना पॉझिटिव्ह आकडा 308 झाला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले, तालुक्यातील एकूण करोना रुग्ण संख्या आता 308 झाली आहे.

त्यातील 103 रुग्ण प्रत्यक्षात उपचार घेत आहेत. 27 नव्या रुग्णांमध्ये त्यातील 7 जण शहरातील आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय टीम काम करत आहे.

तालुक्यातील प्रत्येक व्यक्तींनी काळजी घेण्याची गरज आहे. शासनाच्या नियमाचे पालन करा व कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment