अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६१७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ४९७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.९७ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०३८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४१०० इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५३४ आणि अँटीजेन चाचणीत ३६४ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४८,अकोले ०८, जामखेड १७, कर्जत ०१, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण १९, पारनेर ०४, पाथर्डी ०१, राहाता ०५, संगमनेर ०६, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०२, कॅंटोन्मेंट ०१, मिलिटरी हॉस्पिटल १४, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ५३४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १३५, अकोले ३१, जामखेड ०५, कर्जत ०२, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण ५७,, नेवासा २५, पारनेर १८, पाथर्डी ०९, राहाता ५०, राहुरी ३५, संगमनेर ११०, शेवगाव १९, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३६४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ४४, अकोले ०५, जामखेड २०, कर्जत २६, कोपरगाव १२, नगर ग्रामीण १९, नेवासा २२, पारनेर ११, पाथर्डी ३२, राहाता ३७, राहुरी ३६, संगमनेर ३७, शेवगाव १०, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर ३०, कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ११९, अकोले २१, जामखेड ३७, कोपरगाव २७, नगर ग्रा. ६७, नेवासा ४६, पारनेर २२, पाथर्डी २२, राहाता ५९, राहुरी ४८, संगमनेर ५६, शेवगाव २६, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर ३४, कॅन्टोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या:४३४९७
- उपचार सुरू असलेले रूग्ण:४१००
- मृत्यू:७५०
- एकूण रूग्ण संख्या:४८३४७
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved