अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-कोरोनामुळे निघोज येथील ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पारनेर तालुका हादरला होता. तथापि, मृताच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.
इतर नऊ जणांचेही अहवाल निगेटिव्ह आले असून एकाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. प्रशासनाने पिंपरी, निघोज, चिंचोली, पठारवाडी हे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
नागरिकांच्या आरोग्याची चौकशी सुरू आहे. गुरुवारी संध्याकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अतिरिक्त अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक अजित पाटील, प्रांताधिकारी सुधाकर भोसले
यांनी निघोजची जुनी पेठ, पाण्याच्या टाकीचा परिसरास भेट देऊन तहसीलदार ज्योती देवरे, सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांच्याकडून माहिती घेतली
पिंप्री जलसेन येथेही भेट देत कोरोना सुरक्षा समितीशी चर्चा केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com