अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदा येथील उपकारागृहातील कोठडीत असलेल्या ५५ आरोपींपैकी ३६ आरोपींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी दोन आरोपींची जामिनावर मुक्तता केली आहे.
तर ३४ आरोपींना उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. समजलेली अधिक माहिती अशी की, कोठडीतील काही आरोपींना ताप आला होता.

पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सर्व आरोपींची कोरोना रॅपिड अँटिजेन तपासणी करण्याबाबत वैद्यकीय पथकास सांगितले. त्यानुसार या आरोपींची तपासणी करण्यात आली.
५५ आरोपींपैकी ३६ आरोपींना कोरोनाची बाधा झाली आहे, असे या तपासणीत स्पष्ट झाले आहे.जामिनावर मुक्तता झालेल्या दोन आरोपींना श्रीगोंदा येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात येणार आहे.
या आरोपीच्या संपर्कात असलेले पोलीस व जेवण पुरविणारे कर्मचारी यांची कोरोनाची तपासणी होणार आहे. सर्व आरोपींना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved