अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभर धुमाकूळ घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आता अहमदनगर शहरात देखील आपले पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.जाणून घ्या कोरोना व्हायरसबाबत प्रशासनाचे अपडेट्स, उपाययोजना,निर्णय, माहिती व बातम्या या पेजवर.
(लास्ट अपडेट 4.22 AM 16-03-2020)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने पावले उचलली आहेत.
नगरमध्ये कोरोनाचा आढळून आलेला रुग्ण ठणठणीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे,
नगरमध्ये आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची परिस्थिती आता ठणठणीत आहे. जे हाय रिस्क संशयित रुग्ण होते त्यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान आठ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्यांपैकी एका रुग्णास स्वाईल फ्ल्यू झाला असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले आहे.
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37 वर पोहोचली असून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने शहरातील शाळा, महाविद्यालये, वस्तीगृहे, सिनेमागृहे, शासकीय कार्यालयातील बायोेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे.
रविवारी जिल्हा रुग्णालय येथे कोरोना आजारासंबंधित 27 जणांची तपासणी करण्यात आली. 19 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
त्यातील आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 11 जणांचे रिपोर्ट लवकरच मिळणार आहेत.
Our medical team at the isolation ward in Booth Hospital, Ahmednagar. This isolation ward has 30 independent rooms with attached washroom and toilet facility. pic.twitter.com/yPMANf7KkV
— Rahul Dwivedi (@_Rahuld) March 15, 2020
अहमदनगर जिल्ह्यातील दोघांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी एनआयव्ही, पुणे येथे पाठवले.
#coronavirus आज जिल्हा रुग्णालय #अहमदनगर येथे २७ जणांची तपासणी. सात रुग्ण हे बाहेरील देशातून परत आलेले आहेत तर वीस रुग्ण हे स्वताहून तपासणी साठी दवाखान्यात दाखल. यापैकी दोघांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी एनआयव्ही, पुणे येथे पाठवण्यात आले – जिल्हाधिकारी @_Rahuld@MahaHealthIEC
1/1 pic.twitter.com/N9NqB5QbJB— DISTRICT INFORMATION OFFICE, AHMEDNAGAR (@InfoAhmednagar) March 15, 2020
#coronavirus आज दोन रग्णाचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले. या रुग्णांना देखरेखीखाली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीसाठी आलेल्या उर्वरित रुग्णांवर औषधोपचार करुन घरीच थांबण्याचा सल्ला. नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र, पूर्वकाळजी घ्यावी @_Rahuld 1/2
— DISTRICT INFORMATION OFFICE, AHMEDNAGAR (@InfoAhmednagar) March 15, 2020
या आपत्तीचा एकजुटीने सामना करा…
#coronavirus#Ahmednagar नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र, पूर्वकाळजी घ्यावी. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे आणि या आपत्तीचा एकजुटीने सामना करावा. गर्दीची ठिकाणे टाळा. https://t.co/2mrRGoN2k0
— DISTRICT INFORMATION OFFICE, AHMEDNAGAR (@InfoAhmednagar) March 15, 2020
जिल्हयातील महानगरपालीका, सर्व नगरपालीका/नगरपचंयात क्षेत्रातील चित्रपटगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा व नाटयगृहे दि. ३१ मार्च पर्यत बंद
#coronavirus प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना. #अहमदनगर जिल्हयातील महानगरपालीका, सर्व नगरपालीका/नगरपचंयात क्षेत्रातील चित्रपटगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा व नाटयगृहे दि. ३१ मार्च पर्यत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी @_Rahuld यांचे आदेश. @MahaHealthIEC @NagarPolice
— DISTRICT INFORMATION OFFICE, AHMEDNAGAR (@InfoAhmednagar) March 15, 2020
जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या दि. 31 मार्चपर्यंत बंद.
#अहमदनगर जिल्ह्यातील मनपा, सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालय व आयटीआय, तंत्रप्रशाला 31 मार्चपर्यंत बंद. जिल्हाधिकारी @_Rahuld यांचे आदेश. 10 वी व 12 वी, विद्यापीठाच्या परिक्षा विहीत वेळापत्रकानुसार. @MahaHealthIEC @ilovenagar
— DISTRICT INFORMATION OFFICE, AHMEDNAGAR (@InfoAhmednagar) March 15, 2020
जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हयात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना परवानगी नाही.
#coronavirus प्रादर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना. #अहमदनगर जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हयात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना परवानगी नाही. जिल्हाधिकारी @_Rahuld यांचे आदेश. @MahaHealthIEC@NagarPolice
— DISTRICT INFORMATION OFFICE, AHMEDNAGAR (@InfoAhmednagar) March 15, 2020
#coronavirus प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना. #अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शॉपिंग
मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा (Grocery), दुध व भाजीपाला, अन्य जीवनावश्यक वस्तुू व औषधालय (Chemist Shop) वगळून) 31 मार्चपर्यंत बंद. जिल्हाधिकारी @_Rahuld यांचे आदेश.— DISTRICT INFORMATION OFFICE, AHMEDNAGAR (@InfoAhmednagar) March 15, 2020
जिल्हा रुग्णालयातून पसार झालेले तिघेही संशयित रुग्ण पुन्हा रुग्णालयात दाखल.
#CoronaVirusUpdates#Ahmednagar जिल्हा रुग्णालयातून पसार झालेले तिघेही संशयित रुग्ण पुन्हा रुग्णालयात दाखल. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती@MahaHealthIEC @_Rahuld @ilovenagar
— DISTRICT INFORMATION OFFICE, AHMEDNAGAR (@InfoAhmednagar) March 14, 2020
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com