अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. नेवासे तालुक्यातील सोनई येथे ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
या पार्श्वभूमीवर सोनई प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. परंतु नुकतेच काही दिवसांपूर्वी सोनई गाव कोरोनामुक्त झाले होते. परंतु आता मात्र पुन्हा एक व्यक्ती कोरोनासंक्रमीत आढळून आल्याने ह्या गावात पुन्हा कोरोनाने एंट्री केली आहे.
तसेच नेवासा तालुक्यातील नेवासा, मुकिंदपूर (नेवासाफाटा) याठिकाणीही प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे.
नेवासे तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केला असून तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. नेवासा तालुक्यातील रुग्णांची संख्या 370 वर गेली आहे.
मागील दहा दिवसांत कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढली असून नेवासा शहर व नेवासाफाटा येथे वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन जनता कर्फ्यू सुरू आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आता दहा हजार रुग्णांचा आकडा पार केला आहे. जिल्ह्यात प्रशासनाने कडक उपाययोजना सुरु केल्या असं नागरिकांनीही सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved