अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- गेल्या तीन महीन्यांच्या विश्रांतीनंतर जामखेड शहरातील एका खाजगी डॉक्टरांसह एकुण दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे. शहरातील खासगी हॉस्पीटल मधील एक डॉक्टर हे पुणे येथे आपल्या आजारी कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यासाठी गेले होते.
यानंतर ते काही दिवसांनी जामखेड शहरात आले होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी नगर येथील खाजगी लॅबमध्ये कोरोनाची तपासणी केली होती.
तर शहरातील बीड रोडवर रहाणार्या एका व्यक्ती आजारी असल्याने त्या व्यक्तीने देखील नगर येथील खासगी लॅबमध्ये तपासणी केली होती.
आज दि. २९ रोजी या दोन्ही रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे दोन्ही व्यक्ती शहरात रहात आहेत. त्यामुळे तब्बल तीन महीन्यांच्या विश्रांतीनंतर जामखेड शहरात पुन्हा कोरोनाने एंन्ट्री केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा