अहमदनगर Live24 :- व्हिसाचा गैरवापर करत नगरमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या २६ परदेशी नागरिकांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.
मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तबलिगी जमातसाठी आलेले परदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन करून नगर जिल्ह्यात राहिले.
त्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाली. इतरांनाही क्वारंटाइन करण्यात आले होते. सर्वांचे पुन्हा स्त्राव नमुने घेण्यात आले आहेत.
हे सर्व बरे झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या परदेशी नागरिकांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले.
न्यायालयाने त्यांना आठ दिवस पोलिस कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®