रमजानवर कोरोनाचे सावट, मुस्लिम बांधवांना घरात साजरा करावा लागणार रमजान

Published on -

अहमदनगर :-  रमजान महिना आजपासून सुरु होत आहे. या सणावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांना घरात राहूनच हा सण साजरा करावा लागणार आहे.

नगरमध्ये रमजान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मुस्लिम बांधव तीस दिवस रोजे ठेवतात. या सणासाठी लागणाऱ्या साहित्याची पंधरा दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात येते.

यंदा मात्र या सणावर कोरोनाचे सावट आहे. मुकुंदनगर व आलमगीर ही दोन ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली होती. सर्जेपुरा, झेंडीगेट बागातही लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे.

सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे यंदा घरातच नमाज अदा करावा लागणार आहेत. रमजानमध्ये दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होते.

परराज्यांतून मोठ्या प्रमाणात सुकामेवा विक्रीसाठी येतो. यंदा मात्र फळे व स्थानिक सुक्यामेव्यावरच मुस्लिम बांधवांना समाधान मानावे लागणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe