अतिक्रमणाविरोधात नगरसेवक आक्रमक; पालिकेची डोळेझाक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- राहाता बाजारतळावरील अतिक्रमणातील टपर्‍या पालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी पुन्हा लावल्याने या विरोधात नगर सेवक एकटवले आहे. सदर अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

नगरसेविका निलम सोळंकी यांनी जिल्हाधीकारी यांच्याकडे तक्रार केली असून संबंधित अतिक्रमणे काढून मदत करणार्‍या अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या निवेदनावर निलम दिपक सोळंकी, शारदा बाळासाहेब गिधाड, अनिता अभिजीत काळे, निवृत्ती रेवजी गाडेकर, सचिन विठ्ठल गाडेकर या पाच नगरसेवकांच्या सह्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि , राहता तालुक्याचे तत्कालीन मुख्याधिकारी असीमा मित्तल यांच्या कार्यकाळात नगरपालीकेसमोरील बाजारतळालगतच्या पालिकेच्या जागेवर टपर्‍या टाकून तेथे मटका व इतर अवैद्य व्यवसाय सुरू होता. नागरिकांच्या तक्रारीवरून संबंधित पत्र्याचे गाळे स्वतः त्यांनी काढून टाकले होते.

मात्र सदर जागेवर पालिकेच्या काही अधिकारी व पदाधिकारी यांनी संगनमत करून सदर जागेवर पुन्हा दुकानी उभ्या केल्या असून याबाबत पालिकेकडे तक्रार करूनही त्याकडे डोळेझाक केली जात असून

पालिकेसमोर हे अतिक्रमण सुरू असताना याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आपन तातडीने याप्रश्नी लक्ष घालून संबंधित अतिक्रमण हटवावे व याला जबाबदार असनार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe