कामगाराला अडवून खंडणीसाठी मारहाण.

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- एका कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला नगरमधील मयुर राऊत, पांडुरंग कोतकरसह इतर ८ते १० जणांनी अडवून खंडणीसाठी मारहाण केली. ही घटना अकोळनेर,ता. नगर येथे घडली.

याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात १० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की,अकोळनेर येथील महेश अशोकराव देशमुख (वय ४४) हे एका कंपनीत काम करतात.

नगरमधील मयुर राऊत, पांडुरंग कोतकर यांच्यासह इतर आठ ते दहा जणांनी देशमुख यांना अडविले. आमची टक्केवारी द्या, नाहीतर काम बंद ठेवा.

असे म्हणून देशमुख यांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी देशमुख यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी १० जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment