शिर्डी – शिडी येथून श्री शनि शिंगणापूर येथे जाण्यासाठी मिनी बस नं. एमएच २० एएस ९१९९ हिच्यामध्ये प्रवासासाठी बसवून रस्त्याने गाडी जोरात चालवून फिर्यादी व गाडीतून भक्त प्रवाशांना वाईट वाईट शिवीगाळ करुन श्री शनि शिंगणापूर येथे गेल्यावर माझ्या मालकीच्या दुकानातच पूजेचे ताट घ्या असे म्हणून जबरदस्ती करुन फिर्यादीच्या मुलास शिवीगाळ करून खाली उतरवून तुला दाखवतो, असे म्हणत शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी नागपूर येथील राजेश लक्ष्मण रामटेक या प्रवाशाने शिडी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मिनी बस नं. ९१९९ हिच्यावरील चालक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोना सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.