अहमदनगर : तालुक्यातील बाबुर्डी बेंद फाट्याजवळील राजविर हॉटेल व लॉजिंगवर कांदा मागितल्या कारणावरून तिघास लोखंडी पाईप, खोऱ्याच्या दांड्याने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात ६जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज बाजीराव चोभे, लखन चोभे, दत्ता चोभे, बंडू सावळे (सर्व. रा.बाबुर्डी बेंद ता. नगर), अक्षय रोकडे रा.कोरेगाव ता. श्रीगोंदा) यासह दोन अनोळखींनी जखमी सुनिल फक्कड अडसरे (वय-२४, रा.शेडाळा ता. आष्टी, जि.बीड), ऋषीकेश कांडेकर, वैभव संजय साठे (दोघे. रा.वाळकी, ता. नगर) यांना मंगळवारी लोखंडी पाईप, लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण केली.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी अडसरे हा मंगळवारी राजविर हॉटेलमध्ये जेवण करत असतांना कांदा का दिला नाही अशी विचारणा केली असता त्याचा राग येवून फिर्यादीस व त्याच्या मित्रास डोक्यात, तोंडावर जब्बर मारहाण करण्यात आली.
याबाबत तालुका पोलीस ठाण्यात वरील ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास गायकवाड हे करत आहेत. याबाबत दुसरी फिर्याद मनोज दत्तात्रय चौभे यांनी दिली आहे. यात नमूद केले आहे की,मंगळवारी विश्वजीत कासार रा.वाळकी,सुनिल फक्कड अडसुरे रा.शेडाळा,वैभव साठे पूर्णनाव माहित नाही.
दादा कांडेकर रा.वाळकी,प्रकाश उदावंत रा.देऊळगाव सिध्दी हे सर्वजण हॉटेल राजविरमध्ये आले व त्यांनी चोभे यांचा पुतण्या व वेटरला मारहाण करू लागले. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने फिर्यादी तेथे आले व त्यांनी याबाबत जाब विचारला असता त्यांना देखील आरोपींनी लाथाबुक्यांनी माराहाण केली. या बाबत अधिक तपास पोहेकॉ.लबडे हे करत आहेत.
- नगर जिल्ह्यात आहे असे एक गाव जिथे प्लॅस्टिकच्या कपात चहा मिळणार नाही !
- Big Breaking ! श्रीगोंद्यात शासकीय यंत्रणेच्या सहाय्याने जमीन विक्री; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
- 8 वा वेतन आयोग : शिपाई, शिक्षक, ते आयएएस अधिकारी कोणाला किती मिळणार पगार ?
- 8th Pay Commission : 10 वर्षांची प्रतीक्षा संपली ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ
- दुसऱ्याच्या कर्जाला गॅरेंटर बनण्याआधी दहा वेळा विचार करा! नाहीतर येईल कपाळाला हात मारण्याची वेळ