विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या.

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- घराच्या छताला ओढणीने गळफास घेवून २८ वर्षीय वर्षा गुलाब बाबर (रा. बाबरमळा, बुरुडगावरोड, बुरुडगाव) हिने आत्महत्या केली.

ही घटना गुरुवारी (दि. ३१) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत वर्षा ही न्यू आर्टस कॉमर्स कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत शिकत होती. वर्षाचा स्वभाव शांत व प्रेमळ होता. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment