‘त्या’ने अल्पवयीन मुलीस वारंवार भ्रमणध्वनीद्वारे धमकी देऊन आत्महत्या केले प्रवृत्त

Ahmednagarlive24
Published:

शेवगाव : अल्पवयीन मुलीस वारंवार भ्रमणध्वनीद्वारे धमकी देऊन तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अरुण शहादेव ढाकणे (हसनापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत मुलीची आई राधाबाई तुकाराम ढाकणे यांनी दिलेल्या फिर्याद दिली. सुमारे तीन महिन्यांपूर्वी मी घरकाम करत असताना मुलगी तेजस्विनी फोनवर बोलताना दिसली.

त्यावेळी तू कोणाशी बोलत आहे, मोबाइल कुणाचा आहे असे विचारले असता मी गावातील अरुण ढाकणे याच्याशी बोलत होते व मोबाइल त्यानेच घेऊन दिला, असे तिने सांगितले.

त्यानंतर माझे पती व दीर यांनी अरुण ढाकणे याचे वडील शहादेव ढाकणे यांच्याकडे जावून समाजावून सांगण्यास सांगितले.

त्यानंतर माझा मुलगा त्रास देणार नाही याची मी खबरदारी घेईन, असे त्यांना सांगितले. काही दिवसांनंतर मात्र रात्री १२ वाजता माझ्या पतीच्या मोबाइलवर अरुण ढाकणे याने फोन करून मुलगी तेजस्विनी हिच्याशी बोलू लागला.

या घटनेनंतर आम्ही मुलीला मामाच्या गावी ठेवले. परंतु तिची परीक्षा असल्याने काही दिवसापूर्वी ती पुन्हा हसनापूर येथे आली.

१ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नवीन मोबाइलवर बोलताना दिसली. त्यावर तिने अरुण ढाकणे याने मला मोबाइल घेऊन दिला असून तो मला फोनवर बोलण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे सांगितले.

त्यानंतर शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. घरी परतल्यावर तेजस्विनी घरातील अँगलला ओढणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

याबाबत आम्ही शेवगाव पोलिसांकडे तक्रार केली परंतु त्यांनी दाखल घेतली नाही. जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाला, असे मुलीच्या नातेवाईकानी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment