नगर : नगरमधील प्रगत कला महाविद्यालयाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले चार सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रविवारी रात्रीच्या वेळी महाविद्यालयातील चार कॅमेरे चोरीला गेल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. या डीव्हीआरमधील फुटेज महाविद्यालयाच्या प्रशासनाने तपासले.

त्यात तिघे जण महाविद्यालयाची भिंत चढून महाविद्यालयात येत असल्याचे दिसून येत आहे. सुमारे ६० हजार रुपये किंमत असलेले हे कॅमेरे या चोरट्यांनी लंपास केले.