भावावर चाकूहल्ला; तरूणावर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : रस्त्यात दुचाकी लावल्याच्या कारणावरून राग येऊन एका तरूणीच्या घरात घुसून तिला शिवीगाळ, दमदाटी करीत तिला लज्जा उत्पन्न होईल. असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरूणीच्या भावावर चाकू हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना केडगाव परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजता घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, केडगाव परिसरात राहणारी एक तरूणी घरात टिव्ही पाहत बसलेली असताना येथीलच एक तरूणीच्या घरात घुसला आणि तुम्ही तुमची दुचाकी रस्त्यात का लावली, असे म्हणुन त्या तरूणीस शिवीगाळ, दमदाटी केली.

त्यावेळी त्या तरूणीने तु घरात कसा काय घुसला? असा जाब विचारला असता त्याने तरूणीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तिचा विनयभंग केला.या प्रकरणाने तरूणी खुप घाबरली. यावेळी झालेल्या आवाजाने तरूणीचा भाऊ तिच्या मदतीला आला असता संबंधित तरूणाने त्याच्यावर चाकूने वार केला.

चाकूचा वार गालावर लागल्याने तो गंभीर जखमी झाला.याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी तरूणीच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास हे. कॉ. विकास औटी हे करीत आहेत..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment