शिर्डी – पोलीसात फिर्याद दिल्याने आरोपींकडून होणाऱ्या त्रासातून शिर्डीत श्रीरामनगर कनकरी रोड परिसरात संजय बाळासाहेब चव्हाण, वय – ५० वर्षे या इसमाने पाण्याच्या टाकीजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी मयत संजय चव्हाण यांचे भाऊ केशव बाळासाहेब चव्हाण, धंदा – नोकरी, रा. नागवाडी फाटा, लोणी खुर्द, ता. वैजापूर यांनी काल शिर्डी पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी रविंद्र नवनाथ सालकर, संतोष तरटे,

संतोष भाऊ तरटे, आकाश रविंद्र सालकर, सर्व रा. शिर्डी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीत म्हटले आहे की, मयत भाऊ संजय चव्हाण यांनी आरोपीविरुद्ध शिर्डी पोलीसात तक्रार दिली होती.
या कारणावरून आरोपींनी संजय चव्हाण यांना त्रास देवून मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या त्रासास कंटाळून संजय यांनी कनकुरी रोड, पाण्याच्या टाकीजवळ झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येस वरील आरोपी जबादार असून त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले.