राहाता : येथील पोलीस ठाण्यात बंदोबस्तकामी गेलेल्या महिला होमगार्डचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस हवालदार निजाम शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता शेख याने पोलीस ठाण्यात बंदोबस्तकामी तैनात असलेल्या महिला होमगार्डशी अश्लिल भाषेत संवाद साधला. तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून शरीरसंबंधाची मागणी केली.
त्यानंतर संबंधित महिलेने होमगार्डचे समादेशक यांच्याशी संपर्क साधला. याप्रकरणी संबंधित होमगार्ड महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शेख याच्याविरुद्ध ३५४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण परदेशी करीत आहेत.