अहमदनगर : नगर मनमाड महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१८) रात्री ८ च्या सुमारास घडली.
दिलीप माणिक सोनवणे (वय ४२, रा. वनराई कॉलनी, नवनागापुर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नवनागापुरमधुन सह्याद्री चौकाकडून वनराई कॉलनीकडे जाणाऱ्या रोडने भरधाव वेगात जाणाऱ्या मारूती सुझुकी डिझायर कारने दिलीप माणिक सोनवणे यांना जोरात धडक दिली. या धडकेत सोनवणे हे गंभीर जखमी झाले.
अपघात होताच कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलिसांनी विश्वास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास हे.कॉ. पी.डी. कटारे हे करीत आहेत.
- SIP गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी ! Mutual Fund SIP सुरू ठेवावी का थांबवावी ?
- कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! मारुती फ्रॉन्क्स फक्त ₹6.60 लाखात मिळवा
- Best SUV Under 10 lakhs : दहा लाखांच्या आत मिळतात ह्या 5 कार ! आणि 5 स्टार सेफ्टीसुद्धा…
- Tesla ला टक्कर देणार Tata ची दमदार Sierra EV ! पहा लाँच आणि किंमत
- सोन्याचे भाव 4 हजार रुपयांनी घसरलेत ! 27 फेब्रुवारीचे 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ? महाराष्ट्रात काय आहे स्थिती ?