नगर : मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या महिलेला तरुणाने रस्त्यात अडवून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला.
महिलेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीवर आरोपीने वस्तऱ्याने हल्ला करून त्याला जखमी केले.
बालिकाश्रम रोड येथे सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून नीलेश तुळशीराम गायकवाड याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशनला विनयभंग करणे, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गायकवाड फरारी झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.