नाशिक :- प्रेससंबंधांतून प्रेयसीवर डिझेल टाकून तिला पेटवून देत जिवे मारण्याचा धक्कादायक प्रकार आडगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयिताच्या विरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंभीर जखमी अवस्थेत या महिलेला मेडिकल काॅलेज महाविद्यालयात दाखल करण्यात आल होते. प्रकृती खालावल्याने तिला संंगमनेरला प्रवरा मेडिकल काॅलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आडगाव पोलिसांनी संशयिताला श्रीरामपूरमधून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव पाटी (ता. येवला) येथील या महिलेच्या पतीचा दाेन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. ही महिला मेडिकल काॅलेजच्या उपाहारगृहामध्ये कामास आहे. तेथेच काम करणारा संशयित प्रवीण कृष्णा डोईफोडे (रा. कोणार्कनगर) या विवाहिताचे तिच्यासाेबत प्रेमसंबंध निर्माण झाले.
पीडित महिला खामगाव येथे असताना संशयिताचे तिच्या घरी येणे-जाणे होते. काही दिवसांपासून ही महिला आडगाव येथील दुशिंग मळा येथे भाडेकरारावर राहत होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने संशयिताने तिला लग्नाचे आमिष दिले होते.
घटनेच्या दिवशी संशयित पीडितेच्या घरी गेला होता. तेथे दोघांचा वाद झाला. संशयिताने पीडितेला बेदम मारहाण करत डिझेल टाकून पेटवले.
- व्हॉट्सअॅप चॅट डिलीट झालीये का ? काळजी नको ; हा मार्ग वापरा आणि डिलीटेड मेसेज पुन्हा मिळवा…
- घरात राहूनही करता येईल वजन कमी ! करा या सोप्या गोष्टी…
- स्वारगेट बलात्कार प्रकरण: १३ पथक, श्वान पथक, ड्रोन – तरीही चकवा देणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात!
- तुम्हाला बाहेरचं खाऊन सुद्धा वजन कमी करायचं आहे का ? हो ते शक्य आहे…
- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे अखेर अटकेत