शिर्डी – कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे सासरी नांदत असलेली विवाहीत तरूणी वैशाली संदिप अनर्थे, वय – ३२ हिला नवरा, सासू, सासरा यांनी तू घर बांधण्यासाठी माहेरून पैसे घेवून ये, असे म्हणत वेळोवेळी पैशांची मागणी करून शिवीगाळ करत मारहाण केली.
उपाशी पोटी ठेवून शारिरीक व मानसिक छळ केला. या त्रासातून वैशाली या महिलेने गळफास घेवून आत्महत्या केली. काल या प्रकरणी वैशालीचे माहेरचे नातेवाईक निलेश आनंद कांबळे, रा. महादेवनगर,

कोपरगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी नवरा संदीप भाऊसाहेब अनर्थे, सासू रत्नाबाई भाऊसाहेब अनर्थे, सासरा भाऊसाहेब कचरू अनर्थे, रा. दहेगाव बोलका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.