अपंग मुलीवर बलात्कार

Published on -

संगमनेर: अकोले तालुक्यातील वाशेरे गावात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष वयाची अल्पवयीन तरुणी जी मतीमंद आहे व अपंग आहे ती घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेवून अज्ञात आरोपी मुलीच्या घरात घुसला व तिच्या अपंगपणाचा गैरफायदा घेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.

हा अत्याचार झाल्याने सदर अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली असून काल याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि जोंधळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोसई ढोमणे हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe