अहमदनगर : नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे शेतीच्या वादातून महिलेस मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चंद्रकला भाऊसाहेब मोरे (वय 33, रा. बाबुर्डी घुमट) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
अर्जुन सुखदेव मोरे व मंदा अर्जुन मोरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी चंद्रकला मोरे या त्यांच्या घरासमोर उभ्या होत्या. या दरम्यान आरोपी तेथे आले व त्यांनी मागील भांडणाच्या व शेताच्या वादातून फिर्यादी चंद्रकला मोरे यांना गजाने मारहाण केली.

चंद्रकला मोरे यांची शशिकला यांनाही शिवीगाळ करण्यात आली. अर्जुन व मंदा मोरे या दोघांविरुद्ध भादवी कलम 326, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
- दुष्काळात तेरावा महिना ! बारा गावांचा पाणीप्रश्न ; मिनी भंडारदरा’साठी ग्रामस्थांचे आंदोलन
- 7 एअरबॅग्स आणि लेव्हल 2 ADAS सोबत येणारी मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक SUV किती सुरक्षित आहे ?
- शेअर बाजारात मंदी, पण ‘हे’ 5 स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल, एक्सपर्ट म्हणतात….
- पोटच्या मुलीनेच घरच्यांना जेवणातून दिले विष ! घटनेमागील सत्य समोर आल्यावर…
- किआ सायरोसची धडाकेबाज एंट्री! जबरदस्त फीचर्स आणि किफायतशीर किंमत, मार्केटमध्ये तुफान मागणी