कोपरगाव : शहरातील येवला रोडवरील भाच्याने साडीचा पदर ओढून विवाहित मामीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मामीने भाच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता पती व दोन मुलांसह राहते. तिच्या घराशेजारी भावजय तिच्या मुलासह राहते. बुधवारी (दि. १८) रात्री १०.३० वाजता भाचा दारू पिऊन घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागला.

त्याला समजावून सांगण्यासाठी सदर विवाहिता घराबाहेर गेली असता त्याने मिठी मारून साडीचा पदर ओढून साडी खेचण्याचा प्रयत्न केला. तेथून ती दूर पळाली असता आरोपीने स्वत:च्या अंगावरील सर्व कपडे काढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करू लागला.
याप्रकरणी पीडित महिलेले दिलेल्या फिर्यादीवरून भाच्याविरुद्ध गु. र. नं. ३२३/२०१९ भा. दं. वि. कलम ३५४ (अ), ३५४ (ब), ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Samsung चा Middle Class लोकांसाठी स्पेशल स्मार्टफोन ! आता ६ वर्ष टेन्शन नाही…
- Ola सोबत थेट स्पर्धा देणारी Simple One 2025 स्कूटर स्पीड आणि पॉवरमध्ये आघाडीवर !
- iQOO Z10 Turbo Pro : 7500mAh बॅटरी, Snapdragon 8s Elite प्रोसेसर, 144Hz डिस्प्लेसह ह्या दिवशी होणार लॉन्च
- भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet EV Blackstorm Edition आता मिळणार फक्त 7…..
- 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी – Samsung चा स्मार्टफोन मिळतोय अकरा हजारांनी स्वस्त