श्रीगोंद्यातील त्या गुटखा विक्रेत्यावर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ श्रीगोंदा : गुटखा विक्री व साठा करण्यावर बंदी असताना त्याची विक्री व साठा केल्याप्रकरणी शहरातील दीपक पोपट लोखंडे यांच्याविरोधात अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर गुन्हा हा १२ ते १३ ज़ानेवारी २०२० दरम्यान घडला होता; परंतू १७ फेब्रुवारी २०२० रोजी याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कालावधीत श्रीगोंदा आढळगाव रस्त्यावर चंद्रमा पेट्रोल पंपाजवळ तेजो नावाच्या बंगल्यात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान ५१ हजार ९००रुपये किमतीचा माल आढळून आला.

यामध्ये विमल पान मसाला, एक सुगंधित तंबाखू, हिरा पान मसाला, रॉयल सुगंधी तंबाखू, आरएमडी पान मसाला मोठा व छोटा पॅक, एम सुगंधी तंबाखू आदी, मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर याबाबत पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती दिली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment