अल्पवयीन मुलीचा विवाह करणाऱ्यांवर गुन्हा दाखल !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  नेवासे सलाबतपूर येथील अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याबद्दल चाइल्डलाइनच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चाइल्डलाइनचे प्रवीण श्याम कदम यांनी फिर्यादीत म्हटले आहे, २ डिसेंबरला अज्ञात व्यक्तीने चाइल्डलाइनच्या १०९८ या हेल्पलाइनवर फोन करून कळवले की, सलाबतपूर येथील एका १६ वर्षे वयाच्या मुलीचा विवाह २७ नोव्हेंबरला लावण्यात आला.

तपासाअंती बालविवाह झाल्याचे पुरावे संस्थेला मिळाले. मुलीच्या आई-वडिलांनी तिचा विवाह शेवगाव येथील दिनेश गंगाधर तेलुरे याच्याशी लावून दिला.

तेलुरे कुटुंबालाही मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असताना हा बालविवाह लावण्यात आला. त्यामुळे मुलीचे वडील, आई, तसेच दिनेश तेलुरे, गंगाधर व तारामती तेलुरे यांच्याविरुध्द तक्रार देण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News