जामखेड – तालुक्यातील खुरदैठण गावात जुन्या वादातून दोन गटांत उसळलेल्या दंगलीत दोन जण जखमी होण्याची 15 रोजी घटना घडली होती.
याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून एका गटातील बारा जणांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
केल्याप्रकरणी तर दुसर्या गटातील चार जणांविरोधात विनयभंग व मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दोन्ही फिर्यादीनुसार तब्बल सोळा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जखमींमध्ये एका शिक्षकाचा समावेश आहे. एका गटाला मारहाण करण्यासाठी गुंडांना सुपारी दिल्याचे चर्चिले जात आहे.
दरम्यान या घटनेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ नये यासाठी राजकीय हस्तक्षेप झाला होता
मात्र जामखेड पोलिसांनी राजकीय दबाव झुगारत थेट गुन्हे दाखल करण्याची खमकी भूमिका पार पाडल्याचे बोलले जात आहे.
जामखेड पोलिसांत अशोक डुचे यांनी दिलेल्या आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि १५ जुन रोजी दुपारी दोन वाजता
फिर्यादी अशोक आजिनाथ डुचे हे खुरदैठण येथील शेतातील गट नंबर २७२ मध्ये असलेल्या शेडसमोर उभे असतांना आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीला म्हणाले
की २०१४ मध्ये आमच्याविरोधात केलेली केस मागे घे तेंव्हा मी त्यांना केस मागे घेणार नाही असे म्हणालो असता याचा राग येऊन आरोपींनी
फिर्यादीच्या डोक्यावर तलवारीने वार करून लाकडी दांडके लोखंडी रॉडने पाठीवर डोक्यावर पायावर जबर मारहाण करून जखमी केले व रिव्हॉल्व्हर लावत जीवे मारण्याचा प्रयत्न केला
जखमी अशोक आजिनाथ डुचे हे जबर जखमी झाल्याने त्यांना अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
जामखेड पोलीसांनी जिल्हा रुग्णालयात जखमीचा जवाब नोंदवला त्यानुसार जामखेड पोलिसांनी योगेश राजाभाऊ मुळे, विशाल घनश्याम मुळे, किरण जालिंधर काळे, मंगेश बजरंग मुळे,
घनश्याम भगवान डुचे, संजीवन योगेश मुळे, बंकट दशरथ भोंडवे, रावण ड्रायव्हर व ३ते ४ अनोळखी असे बारा जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी दुसर्या फिर्यादीत महिलेने म्हटले आहे की शेतात मोघडणी सुरू आसताना मी व माझी मुलगी तेथे गेलो असता त्या ठिकाणी
आरोपी अशोक आजीनाथ डुचे, सदानंद अशोक डुचे, पुष्पा अशोक डुचे, मोहिणी अशोक डुचे रा. सर्व खुरदैठन हे तेथे आले
व म्हणाले की तुम्ही येथे मोघडणी करायची नाही म्हणून शिवीगाळ करून आरोपी एक यांने फिर्यादीच्या अंगाशी लगट करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
तसेच केसांना धरून खाली पाडले व हातातील काठीने, गजाने फिर्यादीच्या हातावर पायावर मारले
तसेच आरोपी नंबर दोन याने हातातील लाकडी काठीने हाताला व डोक्यास दुखापत करून जखमी केले व फिर्यादी च्या मुलीस शिवीगाळ केली.
व आरोपी तीन व चार ने हाताने मारहाण केली.या घटनेत महीला जखमी झाली आसुन तीने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस स्टेशनला मारहाण व विनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अंबानी कुटुंबाला रिलायन्समधून किती पगार मिळतो?, लाखो नव्हे कोटींमध्ये जातो हा आकडा!
- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ; जून महिन्याचा हफ्ता जमा होतोय, पण जुलैचा हफ्ता कधी ? समोर आली मोठी अपडेट
- हृदयाच्या आरोग्यासाठी अमृत आहेत ‘या’ देसी गोष्टी, कोलेस्टेरॉलची पातळी झपाट्याने कमी करतात!
- Bank Of Baroda च्या 444 दिवसांच्या एफडी योजनेत 4 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा सविस्तर
- श्रावण महिन्यात ‘या’ अन्नपदार्थांचे सेवन का टाळले जाते?, जाणून घ्या शास्त्रीय कारण!