अल्पवयीन मुलीस नेले पळवून; अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

Published on -

कोपरगाव : कोपरगाव येथील एका अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

तक्रारीत म्हटले की, आपली मुलगी ब्युटी पार्लरच्या क्लासला गेली असता परत घरी आलीच नाही.

शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही. म्हणून कोणा अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी आपल्या मुलीला पळवून नेले आहे.

मुलीच्या वडीलांच्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.बी.एस.कोरेकर करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News