कोपरगाव :- दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असा व्हिडीओ व्हॉटसअॅप ग्रूपवर अपलोड करणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी अटक केली.
कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असा व्हिडीओ आकाश नानाभाऊ खडांगळे (राहणार १०५ हनुमाननगर) याने ‘आकाशभाऊ खंडागळे युवा मंच’ या व्हॉट्सअप ग्रूपवर टाकला.
या प्रकरणी इमरान कालू कच्ची (वय २९) याने कोपरगाव शहर पोलिसांकडे तक्रार दिली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत गुन्हा भादंवि कलम २९५ (अ) प्रमाणे खंडागळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ‘मृत्यूचे तांडव’ सुरूच ! दहा दिवसात अपघातात पाच बळी ; मागणीकडे दुर्लक्ष; नागरिकांचा आक्रमक पवित्रा
- पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला किती पगार असायला हवा? अर्ज करा परंतु त्याआधी अटी वाचा
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा
- आधी नियमित व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करा नंतरच पाणीपट्टी दरवाढ करा : अॅड. आगरकर
- काकडी, आद्रक, शिमला मिरची, चवळी, गवार स्थिर