गल्लीत राहणाऱ्याकडून घरात घुसून बलात्कार

Ahmednagarlive24
Published:

नगर  – नगर शहरात काटवन भागात एका गल्लीत राहणाऱ्या १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर ती घरी एकटी असताना गल्लीतच राहणारा आरोपी प्रविण दिलीप जाधव हा घरात आला व शरीरसंबंधाची मागणी केली.

त्यावेळी अल्पवयीन तरुणीने विरोध करत आरडाओरडा केला. मात्र आरोपी प्रविण जाधव याने मोबाईलमध्ये असलेले दोघांचे फोटो मी व्हायलर करील, अशी धमकी देवून बळजबरीने अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.

१२ वाजता हा खळबळजनक प्रकार घडला. काल याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने कोतवाली पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन प्रविण दिलीप जाधव याच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला असून डिवायएसपी मिटके, पो.नि. वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोसई श्रीवास्तव हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने नगर शहरात खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment