अहमदनगर :- मुलबाळ होत नाही तसेच माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, या कारणातून १९ वर्षीय विवाहितेस जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे हा प्रकार घडला.
याप्रकरणी पती, सासू, सासरे, दीर, जाऊ यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. श्वेता सुधीर पंचमुख असे विवाहितेचे नाव असून काही दिवसांपूर्वीच तिचा विवाह झालेला आहे.

लग्नानंतर काही महिन्यातच श्वेताचा शारिरीक व मानसिक छळ सुरू झाला. लॅब टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, तुला मुलबाळ होत नाही असे म्हणत पती सुधीर व सासू केशरबाई यांनी शिवीगाळ केली.
श्वेता ही चुलीजवळ स्वयंपाक करत असताना सासू केशरबाई व जाऊ आरती यांनी चुलीवर ढकलून देत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. श्वेता हिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.