अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केल्याच्या रागातुन ६ ते ७ जणांनी एकावर प्राणघातक हल्ला केला.

हि घटना गुरुवारी रात्री ११ वा.शहरातील गांधी मैदानात घडली.याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी खुनाचे प्रयत्नाचे गुन्ह्याची नोंद केली असून सुरज सुभाष जाधव,दर्शन करांडे,भैय्या डहाळे यांना अटक केली.


याबाबत पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की,गुरुवारी रात्री ११ वा.सुमारास आदित्य संजय गवळी,वय २२,रा.बालिकाश्रम रोड,अ.नगर.हा गांधी मैदान येथे आला असता,सुरज जाधव,दर्शन करांडे,भैय्या डहाळे यांनी तेथे येऊन तु भाजपाचा प्रचार का केला असे म्हणून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

तसेच काचेची बाटली डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.या प्रकरणी समीर ज्ञानोबा गवळी रा.शिलाविहार,गुलमोहर रोड,अ.नगर.यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुरज जाधव,दर्शन करांडे,भैय्या डहाळे व इतर अनोळखी ३ ते ४ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.