राहाता :- सतत चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नवर्याच्या त्रासाला कंटाळून संतप्त बायकोने जेवनात विष कालवून त्याला मारल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील साकुरी गावात घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि,साकुरी गावातील सुनिल बंन्सी बनसोडे व पत्नी मिना सुनिल बनसोडे हे दोघे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
मात्र सुनिल नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याचाच राग मनात धरून पत्नीने रात्री मटन करून त्यात विष कालवले आणि पतीला खायला दिला.
उलट्या आणि मळमळीचा त्रास झाल्याने पतीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पण उपचारादरम्यान 22 जानेवारीला त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसानी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे.