शिर्डी : नाशिक अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तब्बल पाच लाखांची लाच स्वीकारताना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपसंचालक रामचंद्र रतिलाल सोनकवडे, विधी अधिकारी शिवप्रसाद मुकुंदराव काकडे आणि दोन खासगी व्यक्ती विनायक ऊर्फ सचिन उत्तमराव महाजन, मच्छिंद्र मारुती गायकवाड पाच लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
शिर्डी येथील साई आसरा हाॅटेल समोर एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आणि तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचे अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नाशिक कार्यालयात अर्ज केला होता.

मात्र, प्रमाणपत्र देण्यासाठी पाच लाखांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने एसीबीच्या नाशिक कार्यालयात तक्रार केली. अहमदनगर व नाशिक पथकाने संयुक्तपणे शिर्डी येथे सापळा रचला. चालक महाजन, खासगी व्यक्ती मच्छिंद्र गायकवाड या दोघांना शिर्डी येथील हाॅटेल परिसरात पाच लाखांची लाच घेताना पथकाने रंगेहाथ अटक केली.
- फेब्रुवारीत ग्रहांची चाल बदलणार; वृषभ, सिंह आणि कन्या राशींवर कसा असेल परिणाम?
- भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी योगी सरकारचे कठोर पाऊल; संपत्ती जाहीर न करणाऱ्या 68 हजार कर्मचाऱ्यांचा पगार रोखणार
- लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय; केवायसी केलेल्या महिलांची होणार प्रत्यक्ष पडताळणी, काहींचा हप्ता कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता
- नागपूरकरांसाठी पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा नवा अध्याय; १४ फेब्रुवारीला PM ई-बस सेवेचा शुभारंभ
- 10 ग्रॅम सोन्यावर किती कर्ज मिळतं? व्याज, EMI आणि नियमांचा ‘ए टू झेड’ हिशोब













