महिलेला चुकीचा स्पर्श केल्याने भारतीय व्यक्तीला दीड लाख रुपये दंडासह झाली हि शिक्षा !

Published on -

सिंगापूर : सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला चर्चमध्ये महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याने पाच दिवसांचा कारावास आणि २५०० सिंगापुरी डॉलर (सुमारे दीड लाख रुपये) दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

राजेंद्रन प्रकाश चर्चमध्ये दारू पिऊन गेला आणि त्याने एका महिलेला हात लावत गळाभेट घेतली. घटना गेल्या वर्षातील आहे.

प्रत्यक्षदर्शी इयू सेंग की चर्चमध्ये प्रार्थना करीत होते, तेव्हा त्यांनी आवाज ऐकला आणि पाहिले की, राजेंद्रन त्याचे हात महिलेच्या खांद्यावर रगडत होता. महिलेने पोलिसात तक्रार दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe