अहमदनगर / प्रतिनिधी : नगर – पुणे रोडवरील केडगाव बायपास चौफुला कांदा मार्केट जवळ रविवारी रात्री ११ च्या सुमारास ट्रकला (एम एच 14 एफ 57 ३७ ) बोलोरो( एम एच 17 व्ही ९२४६ ) आडवी लावून ट्रक चालकाला दमदाटी करून स्टील रॉडचा धाक दाखवून अंधारात घेऊन जाऊन त्याच्याकडील ७ हजार रुपये रोख रक्कम व एक खाकी कलर चे पाकिट पळविल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी पोपट बाबासाहेब पालवे( वय 40 वर्ष धंदा चालक-मालक राहणार वेताळवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड ) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके ,पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी कर्मचार्यासह घटनास्थळी भेट दिली.
मिळालेल्या माहीतीवरून तपास करून अवघ्या ६ तासात तीन आरोपीपैकी एका आरोपीला बोलोरोसह पकडले.आरोपीला अटक करून बोलोरो जप्त करण्यात आली.
समजलेली माहिती अशी पोप ट बाबासाहेब पालवे (वय 40 वर्ष धंदा चालक-मालक राहणार वेताळवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड ) हे रात्री ट्रक नंबर एम एच 14 एफ 57 37 घेऊन जात असताना
आरोपी : – मयूर दिलीप सूर्यवंशी ( राहणार आझाद चौक तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर ) व दोन अनोळखी इसम यांनी ट्रक ला बोलोरो आडवी लावून तू आमच्या गाडीला कट मारला तू थांबला का नाही असे म्हणून त्याला खाली ओढून दमदाटी केली व अंधारात घेऊन जाऊन त्याच्याकडील रक्कम काढून घेतली
घटना घडताच ट्रक चालकाने माहिती केडगाव चौकीला दिली .ट्रक चालकाच्या फिर्यादीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात ( गु.र.क्र व कलम : 880/2019 ) भा.द.वी कलम- 394, 341, 363, 504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
पोलीस निरीक्षक विकास वाघ ,कर्मचारी भागवत ,काकडे गाडाल व पथकाने रात्रभर फिरून एक आरोपी मयूर दिलीप सूर्यवंशी जेरबंद केला आरोपीला अटक करून बोलोरो जप्त करण्यात आली.
- अहिल्यानगरच्या बाजार समितीत चोरट्यांनी एकाच रात्री फोडली आठ दुकाने, लाखोंच्या मुद्देमालाची चोरी; हाकेच्या अंतरावरच पोलिस चौकी
- भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस, भंडारदरा धरण ७ टीएमसी पार तर निळवंडे ५३% भरले
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 8 व 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्वच शाळा बंद राहणार, कारण काय ?
- अहिल्यानगर शहरात उभ्या राहणाऱ्या नाट्य संकुलासाठी १३ कोटींच्या निधींची गरज, नाट्य संकुलात ‘या’ असणार आहेत खास सुविधा
- ‘दोन दिवसात जीवे ठार मारू…’ अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना धमकी !