अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- लग्नाला सात वर्षे झाली, तरी तुला मुलबाळ होत नाही. असे म्हणत विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी व सासुने तीला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पतीसह सासू विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रांती इंद्रजीत नागरगोजे (पती) व लताबाई इंद्रजीत नागरगोजे (सासू , दोघे रा.जयवंत नगर, तालुका भूम.जिल्हा उस्मानाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित विवाहिता अश्विनी क्रांती नागरगोजे, वय २५ वर्षे रा.जयवंत नगर, ता.भुम जिल्हा उस्मानाबाद हिचे सात वर्षापूर्वी माजलगाव, जिल्हा बीड या ठिकाणी लग्न झाले होते.
मात्र लग्नाला सात वर्षे होऊनही मूलबाळ होत नसल्याने तीची सासू व पती हे तीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होते. रविवार दि.५ रोजी सायंकाळी गावात सप्ताहाचा कार्यक्रम असल्याने पीडित विवाहितेने गावात कीर्तनाचा कार्यक्रम आहे.
तेव्हा मी कीर्तनाला जाऊ का असे विचारले असता सासूने तीला विरोध करत शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर ती कीर्तनाला जात नाही असे सांगितले तरी देखील मारहाण करून आता तु शेवटच्या कीर्तनाला जा, असे म्हणून फिर्यादी महीलेचे हात धरले व पतीने तीचे नाक दाबून तीला विषारी औषध पाजले.
यानंतर फिर्यादी महिलेस जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पीडित महिलेने जामखेड पोलिस स्टेशनला पती व सासु विरोधात तक्रार दाखल केली होती. जामखेड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात गुन्हा दाखल करुन घेतला.