नेवासे :- चुलत भावजयीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सख्या चुलतभावाचा खून करून विजेचा शॉक बसल्याचा बनाव करणाऱ्या बाळासाहेब बाबासाहेब भगत (धेडगे) याला शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
देवगाव येथे २ एप्रिल १७ रोजी ही घटना घडली. आरोपी बाळासाहेबचे चुलतभाऊ शंकर भानुदास भगत (धेडगे) (वय ३०) याच्या पत्नीशी अनैतिक संबध होते.
हे समजल्याने शंकर पत्नीला मारहान करे. शंकरचा कायमचा काटा काढण्याचा त्यांचा विचार होता. २ एप्रिल १७ रोजी रात्री शंकर शेतात पाणी भरण्यासाठी जाणार असल्याने खुनाचा कट रचण्यात आला.
बाळासाहेबने अंधारात जाऊन विहिरीशेजारी बसलेल्या शंकरच्या डोक्यात जोरात गजाचा फटका मारला. नंतर शंकरला विजेचा शॉक बसल्याचा बनाव करण्यात आला.
तत्कालीन पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना संशय आल्याने त्यांनी हवालदार बाबासाहेब लबडे यांच्यासह मृतदेहाची पाहणा केली असता अनेक जखमा आढळून आल्या.
बाळासाहेबला पोलिसी हिसका दाखवताच त्याने घटनाक्रम सांगितला. न्यायाधीश टिकले यांनी बाळासाहेबला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मृताची पत्नी संगीताची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.
- अमित शाहांची तडिपारी दरोडा,चोरीसाठी नव्हती ! भाजप नेते विनोद तावडेंचे पवारांवर टीकास्त्र
- केजरीवाल, सिसोदियांविरुद्ध हवालाकांडाचा खटला चालणार ; दिल्लीच्या रणधुमाळीत अडचणी वाढल्या
- दक्षिण कोरियाच्या पदच्युत राष्ट्रपतींना अखेर अटक ; आणीबाणी लागू करणे भोवले
- झुकरबर्गच्या वक्तव्यासाठी मेटा इंडियाने मागितली माफी
- खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर ईडीचा हस्तक्षेप का नाही ? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल…